Krishna Janmashtami In Marathi | श्रीकृष्ण जन्माष्टमी, गोकुळाष्टमी ची माहिती

 Krishna Janmashtami In Marathi नमस्कार मित्रानो मराठी ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे, हिंदू श्रद्धेनुसार भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म याच दिवशी झाला होता. भगवान श्रीकृष्णाच्या भक्तासाठी हा सण खूप खास असतो या दिवशी लोक उपवास धरतात आणि रात्री १२ वाजता पूजा झाल्यानंतर, उपवास सोडला जातो,

Krishna Janmashtami In Marathi

श्री कृष्ण चा जन्म कसा झाला?

जेव्हा जेव्हा असुरांचे अत्याचार वाढले आणि धर्माचे पथन झाले, तेव्हा तेव्हा प्रभुणे पृथ्वी वर अवतार घेऊन सत्य आणि धर्माची स्थापना केली , अशात च श्रावणाच्या कृष्णपक्षाच्या अष्टमीच्या मध्यरात्रीत अत्याचारी कंस चा विनाश करण्यासाठी मथुरामध्ये श्री कृष्ण ने अवतार घेतला, स्वयंम प्रभू या दिवशी पृथ्वीवर अवतरित झाले म्हणून हा दिवस कृष्ण जनामाष्टमी म्हणून साजरा केला जातो.

श्रीकृष्ण जन्म उत्सव हा संपूर्ण भारतातात सगळी कडे दरवषी मोट्या उत्साहात साजरी केला जाते, गोकुळ , मथुरा, वृदावन , द्वारका , जनकपुरी या ठिकाणी जन्माष्टमी हि मोट्या प्रमाणात साजरी होते, ओरिसा मध्ये यादिवशी दही हंडी जत्रा आणि यात्रा भरते, जन्माष्टमी म्हणजे गोकुळाष्टमी कृष्ण जन्माचा दिवस श्रावण महिन्यात वाध्य अष्टमीला या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर, मथुरेत कंसाच्या बंदिस्थ कोठडी मध्ये श्रीकृष्ण जन्म झाला,

श्रीकृष्ण हे देवकीचे आठवे अपत्य म्हणून जन्माला आले होते. मथुरेत जन्म झाल्यानंतर कृष्ण गोकुळात गेला. जिथे त्यांचा जन्मोत्सव धूम-धडाक्यात साजरा केला जातो.

भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सव हा श्रीकृष्ण जयंती म्हणून हि साजरा केला जातो आणि त्याच्या दुसर्‍या दिवशी गोपाळकाला साजरा केली जाते. यंदा श्रीकृष्ण जन्माष्टमी Friday, September 4, 2026 साजरी करण्यात येणार आहे.

भगवान श्रीकृष्ण ना ६४ कलांचे स्वामी समजले जाते, ज्याची भक्ती भावाने पूजा केल्यास जीवनातील सर्व पापापासून मुक्ती मिळते आणि सुख आणि सौभाग्य लाभते, ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने द्रौपदीची लाज वाचवली होती, त्याच प्रमाणे भगवान श्रीकृष्ण आपल्या भक्तांना संकटातून वाचवण्यासाठी एका आवाजात येतात.

कोणत्याही श्रीकृष्णाच्या मंदिरात जेव्हा आपण जातो, तेव्हा आपण दोन गोष्टी नेहमी एकत्रित बघितल्या असतील ते म्हणजे त्याच्या डोक्यावरील मोराचे पीस आणि दुसरे म्हणजे त्याच्या हातातील बासुरी या दोन्ही गोष्टीचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे.

जन्माष्टमी चे पूजन कसे करावे?

सप्तमी च्या ठीक रात्री १२ वाजता घरातील सर्व मंडळी नि किंवा मंदिरातील सर्व भक्त मंडळी नि एकत्र येऊन कृष्ण जन्म साजरा करावा, देवकी वासुदेवासह सर्वांच्या नावाच्या उच्चार करावा, देवकी मातेला आदरपूर्वक अर्द्य द्व्यावे आणि या नंतर श्री कृष्णाची पूजा कार्याला सुरवात करावी.

सर्वात आधी शुभ मुहूर्तावर श्री कृष्णाचा दुग्ध अभिषेक करावा, पंचांग मृताने म्हणजे दही तूप साखर मध दूध याने स्नान घालावे नंतर गंगा जलाने स्नान घालावे, स्नान झाल्यानंतर बाळ श्रीकृष्णाचा श्रुंगार करावा आणि वस्त्र परिधान करावे व दागिने घालावे म्हणजे आभूषणे चढवावी आणि नंतर कपाळावर चंदन आणि अक्षदाचा टिळा लावावा.

भगवान श्री कृष्णच आवडीचे लोणी पंचामृत तसेच तुलसी पत्राचा आणि फराळाचं नैवेध दाखवे , बाळकृष्णाला जोपल्यात बसवावे आणि भजन कीर्तन करावे आणि त्यानंतर विसर्जण्याच्या वेळी जर मूर्ती शॅडो ची असेल तर तिथी पूर्ण जलाशयात विसर्जन करावे आणि धातू ची असेल तर ती नेहमीच्या जागी परत देवघरात ठेवावी.

मित्रानो माहिती मध्ये काही चुका अडल्यास आम्हला संपर्क साधावा आम्ही त्यात लगेच सुधार करू

Previous Post Next Post