Balasaheb Thakre Quotes Marathi
Balasaheb Thakre Quotes Marathi
जीवनात एकदा निर्णय घेतला की मागे फिरू नका, कारण मागे फिरणारे इतिहास रचू शकत नाही
तुमच्याकडे आत्मबल असेल तर जगाच्या पाठीवर कुठेही जा तुम्हाला मरण नाही.
वयाने म्हातारे झाले
तरी चालेल पण
विचाराने कधी म्हातारे नका होऊ.
माझ्या वडिलांच्या संस्कारामुळे भीती नावाचा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
नोकऱ्या मागणाऱ्यांपेक्षा नोकऱ्या देणारे होऊ, ही महत्वकांक्षा बाळगा
तोंड वाजवून न्याय मिळत नसेल
तर तोंडात वाजवून न्याय मिळवा
पण न्याय मिळालाच पाहिजे.
मुंबई आपली आहे आपली, इकडे आवाजही आपलाच हवा.
मला जे देश हिताचे असेल ते मी करत राहणार मला खटल्यांची पर्वा नाही.
पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना पायाखाली तुडवायला माझ्या आदेशाची वाट पाहू नका.
एकजुटीने राहा जाती आणि वाद गाडून मराठी माणसांची भक्कम एकजूट उभारा तरच तुम्ही टिकाल आणि महाराष्ट्र ही टिकेल.
माझा प्रत्येक गुन्हा माझा विचार बनून लाखो लोकांच्या रक्तात वाहेल आणि त्या रक्तातील प्रत्येक थेंबात जिवंत राहील हा “बाळ केशव ठाकरे”
मराठी हा सन्मान आहे. मराठीला “व्हाय” विचारणाऱ्याला त्याची माय आणि बाप दाखविलाच पाहिजे.
या तरुणांमध्ये जर देशाभिमान भिनवायचा नसेल तर मग कशात भिनवायचा ? म्युनिसिपाल्टीच्या नळात ?
आत्मबळ असेल तर ज्योतिषाकडे जाऊ नकोस… हात दाखवू नकोस.. निराळ्या पद्धतीने दाखव आत्मविश्वास असेल तर जगाच्या पाठीवर कुठेही जा, मरण नाही..