Lohri Festival Information in Marathi | लोहरी उत्सवाची माहिती

Lohri Festival Information in Marathi: नमस्कार मित्रानो आज आपण जाणून घेणार लोहरी या सण बद्दल, लोहरी किंवा लोहडी हा सण एक पंजाबी सण आहे.

Lohri Festival Information in Marathi

लोहरी हा सण पंजाब मध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, लोहरी हा सण प्रत्येक वर्षी १३ जानेवारी ला असतो, लोहरी हा सण मकरसंक्रांत सणाच्या आदल्या दिवशी लोहारी साजरा केला जातो.

तर आपण आता जाणून घेऊया लोहरी का मानवीले जाते. याचे मुख्य कारण आहे. एक म्हणजे हिवाळा ऋतूला निरोप देणे असा या उत्सवाचा हेतू असतो. त्याचबरोबर हा सण साजरा करण्याचा आणखीन एक उद्देश म्हणजे हा काळ शेतकऱ्यांसाठी आनंदाचा काळ मानला जातो.

या सणामध्ये अग्नीपूजा ला महत्वाचे वैशिष्ट्य मानले जाते. हिवाळा ऋतू असल्याने शेकोटी पेटविणे याला पारंपरिक महत्व मिळाले आहे, गूळ,गजक, उसाचा रस यांचा समावेश या दिवशी खाण्यात आवर्जून समावेश केला जातो.

गावाकडील लोक गावाच्या मध्यभागी सूर्यास्ताला संध्याकाळी शेकोटी पेटविली जाते. आणि त्यामध्ये तीळ, गूळ वाहतात. त्याभोवती रिंगण घालून बसतात आणि लोकगीते गातात आणि पारंपरिक नृत्य करतात. शेतातील ताजी मक्याची कणसे भाजून खाणे हा एक विशेष कार्यक्रम असतो. शेतात आलेला लाल मुळा हा सुद्धा या दिवशी जेवणात समाविष्ट केला जातो. मोहरीच्या पानांची भाजी, मक्याची पोळी, किंवा भाकरी हे पदार्थ बनऊवन खातात. तीळ घालून केलेला भात या दिवशी जेवणात समाविष्ट असतो. याला त्रिचोली म्हटले जाते.

या सणाचे काय महत्व आहे

सुगीच्या काळातील हाती येणा-या शेतातील पिकाचा आनंद साजरा करणे असे या सणाचे महत्व आहे. भारताच्या काही भागामध्ये लोहरी हा सण पतंग उडवून साजरा केला जातो.

Previous Post Next Post