नमस्कार मित्रानो आपल्या ईथे आपल्याला लग्नासाठी नवरी व नवरदेवासाठी काही खास निवडक उखाणे घेऊन आलोत
Marathi Nave Lagnasathi
Navriche Ukhane
छन छन बांगड्या, छुम छुम पैंजन,
… रावांचे नांव घेते, ऐका सारे जण.
मंदिरात वाहाते, फुल आणि पान,
… रावांचे नांव घेते, ठेऊन सर्वांचा मान
पंच पक्वांनाच्या ताटात, वाढले लाडू पेडे,
… रावांचे नांव घेतांना, कशाला आढे वेढे.
बारीक मणी घरभर पसरले,
…… साठी माहेर विसरले.
चंदेरी चळिला सोनेरी
बटन
………..रावांना आवडते तंदूरी
चिकन.
नवे घर ,नवे लोक, नवी नवी नाती
संसार होईल मस्त
…………….. राव असता सोबती.
गळ्यात मंगळसूत्र, मंगळसूत्रात डोरलं, ….. रावांचे नाव माझ्या हृदयात कोरलं.
गुलाबाच्या झाडाला फूल येतात दाट,
…रावांचे नाव घेते सोड़ा माझी वाट.
नदीच्या काठावर कृष्ण वाजवितो बासरी,
…रावां सोबत आली मी सासरी.
दारी होता टेबल, त्यावर होता फोन,
… रावांनी पिक्चर दाखवला हम आपके हैं। कौन?
जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,
….. रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने
Marathi Ukhane Navrdevasathi
काही शब्द येतात ओठातून, …… चं नाव येतं मात्र हृदयातून.
भाजीत भाजी मेथीची, ……माझ्या प्रितीची.
जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, …….च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने.
नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, ……..झाली आज माझी गृहमंत्री.
अजिंठा वेरूळची शिल्पे आहेत सुंदर, ………..माझी सर्वांपेक्षा सुंदर
चांदीच्या ताटात रुपया वाजतो खणखण, ………चे नाव घेऊन सोडतो कंकण.
पंचपक्वनाच्या ताटात वाढले जलेबी,पेढे, ………चे नाव घ्यायला कशाला आढे वेढे.