Farewell Quotes In Marathi:- Farewell Messages In Marathi, Farewell Wishes In Marathi
Farewell Quotes In Marathi
आयुष्याच्या प्रवासात चांगली माणसं भेटतात आणि चांगल्या आठवणी देऊन जातात, तुमच्यासोबत घालवलेल्या गोड आठवणी कायम माझ्या ह्रदयात राहतील
निरोपाच्या क्षणी डोळ्यात हासु आणि आसु, आता मात्र माझे मन खोल आठवणीत लागले आहे रुसू
मला आठवतात ते सारे क्षण जे आपण सोबतीने घालवले.. पुन्हा ते क्षण नक्कीच येतील. तुला तुझ्या उज्जल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा
कधा कधी निरोप घेणं ही फार महत्त्वाचं असतं, कारण त्यामुळेच पुन्हा भेटण्याची ओढ निर्माण होते.
उद्या आपण एकत्र नसू, आठवणी मात्र कायम स्मरू, हा क्षण कधीच विसरता येणार नाही, आजच सारे आयुष्य जगू
चंद्रतारे आणि सुर्यमंडळ सारे काही कमी पडेल
इतका तुझ्या आयुष्यात यशाचा प्रकाश पडू दे
नव्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा
निरोपाचा क्षण नाही, शुभेच्छा सण आहे
पाऊल बाहेर पडताना रेंगाळणारे मन आहे