Gudi Padwa Information In Marathi | गुढीपाडवा सणाची माहिती

Gudi Padwa Information In Marathi: गुडीपाडवा हा भारतीय संस्कृतीतला एक महत्वाचा सण आहे , हा हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो.

Gudi Padwa Information In Marathi

वसंत ऋतूची चाहूल देणारा हा गुडीपाडवा, संपूर्ण भारतात हा सण उत्साहाने साजरा केला जातो, प्रभू रामचंद्रांची रावणाचा पराभव करून वनवास संपवून अयोघ्या नगरीमध्ये प्रवेश केला, त्यादिवशी श्रीरामाचे स्वागत करण्यासाठी अयोध्येतील प्रजेने गुढ्या तोरणे उभारली होती आणि आनंद साजरा केला होता.

तीच प्रथा पुढे वर्षानुवर्षे चालत आली , म्हणून आजही घरोघरी गुडी उभारली जाते. या नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी घराच्या दारासमोर गुडी उभारली जाते , गुडी उभारण्याकरिता लाभ काठी घेऊन तिच्या टोकावर जरीचे किंवा रेशमी वस्त्र बांधले जातात , त्यावर कडू लिबांची, पाने रंगीबिरंगी बत्ताशाची माळ, आबाच्या डहाळ्या , व फुलाच्या माळा, बांधल्या जातात. आणि त्यावर एक कलश ठेवला जातो.

ती गुडी बांधून तिची पूजा केली जाते , त्यामुळे हा दिवस म्हणजे साडेतीन मूहुर्तापैकी एक महत्वाचा मुहूर्त मानला जातो, दारी उभारलेली गुडी विजय आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते , या दिवशी लोक वस्तू खरेदी सोने खरेदी करतात.

काही लोक या मूहूर्तावर व्यवसायाचा प्रारंभ किंवा नवीन उपक्रमाचा प्रारंभ करतात, या दिवशी घरोघरी गोड पदार्थ बनवले जातात , गोडधोड पुरण पोळी , श्रीखंड पुरी चा बेत करतात आणि दिवसाची सुरवात गोड करतात.

गुडी पांडवाच्या दिवशी सर्वत्र साफसफाई करतात दारात सुंदर रांगोळी काढतात , या दिवशी कडुलिबची कोवळी पाने खाण्याची प्रथा आहे , कडुलिबच्या पानांमुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि रक्त शुद्ध होते.

गुडीपाडवाच्या निमित्ताने हिंदू हिंदूसंस्कृतीची झलक दाखविणाऱ्या मिरवणूक काढल्या जातात या मध्ये महिला व पुरुष आणि लहान मुले पारंपरिक पोशाख घालून सहभागी होतात.

मागील वर्षातील सर्व काही विसरून ,नवीन वर्षाची सुरवात आनंदाने उत्साहाने करावी आणि येणारे नवीन वर्ष आनंदाचे , भरभराटीचे जावो हि ईश्वरचरणी प्रार्थना करावी, हाच संदेश गुडीपाडवाचा सण आपल्याला देतो.

Previous Post Next Post