Maharashtra Police Bharti Hall Ticket | पोलीस भरती प्रवेशपत्र जाहीर

Maharashtra Police Bharti Hall Ticket released. Download Police Bharti Admit Card for 15300+ Police Constable, Driver, SRPF, Bandsmen & Prison Constable Physical Exam.

महाराष्ट्र पोलीस भरती 2025 अंतर्गत शारीरिक चाचणी (Physical Test) फेब्रुवारी 2026 पासून सुरू होणार आहे. उमेदवारांनी वेळेत प्रवेशपत्र डाउनलोड करून तयारी करावी.

महत्वाची माहिती

शारीरिक चाचणी फेब्रुवारी 2026 पासून 

शारीरिक चाचणी प्रवेशपत्र  Click Here 

अधिक माहिती  Click Here

नमस्कार विध्यार्थी मित्रानो महाराष्ट्र पोलीस भरती 2025–26 अंतर्गत 15,000 पेक्षा अधिक जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरतीमध्ये पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, SRPF, बँड्समन आणि कारागृह शिपाई (Jail Constable) या पदांचा समावेश आहे.

या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 29 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2025 या कालावधीत पूर्ण करण्यात आली होती. पात्र उमेदवारांसाठी निवड प्रक्रियेचा पहिला टप्पा म्हणून शारीरिक कार्यक्षमता व शारीरिक मोजमाप चाचणी (PET / PST) घेण्यात येत आहे.

आता या टप्प्यासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचे महाराष्ट्र पोलीस शारीरिक चाचणी प्रवेशपत्र 2026 अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे.

हाराष्ट्र पोलीस भरती 2025 – संक्षिप्त माहिती

तपशीलमाहिती
भरतीचे नावमहाराष्ट्र पोलीस शिपाई व संबधित पदे भरती 2025
भरती करणारी संस्थामहाराष्ट्र पोलीस विभाग
पदेपोलीस शिपाई, चालक, SRPF, बँड्समन, कारागृह शिपाई
एकूण जागा15,631
परीक्षा टप्पाशारीरिक चाचणी (ग्राउंड टेस्ट)
प्रवेशपत्र स्थितीजाहीर
प्रवेशपत्र जाहीर तारीख7 फेब्रुवारी 2026
अधिकृत संकेतस्थळpolicerecruitment2025.mahait.org
प्रवेशपत्र पद्धतऑनलाइन
आवश्यक तपशीलअर्ज क्रमांक व जन्मतारीख

महाराष्ट्र पोलीस शारीरिक चाचणी प्रवेशपत्र 2026 डाउनलोड लिंक

उमेदवारांनी आपले महाराष्ट्र पोलीस शारीरिक चाचणी प्रवेशपत्र 2026 अधिकृत संकेतस्थळ policerecruitment2025.mahait.org वरून डाउनलोड करावे.

वेबसाइटच्या मुख्य पृष्ठावर “Physical Test Hall Ticket / शारीरिक चाचणी प्रवेशपत्र” या लिंकवर क्लिक करावे. त्यानंतर लॉगिन पेजवर आवश्यक माहिती भरून प्रवेशपत्र PDF स्वरूपात डाउनलोड करता येईल.

प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी आवश्यक माहिती

महाराष्ट्र पोलीस PET / PST प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील तपशील आवश्यक आहेत:

अर्ज / नोंदणी क्रमांक

जन्मतारीख (Date of Birth)

👉 अर्ज करताना दिलेली माहिती अचूकपणे भरावी.

महाराष्ट्र पोलीस शारीरिक चाचणी प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे?

महाराष्ट्र पोलीस भरती शारीरिक चाचणी हॉलतिकीट डाउनलोड करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:

policerecruitment2025.mahait.org या वेबसाइटला भेट द्या.

Physical Test Hall Ticket या लिंकवर क्लिक करा.

अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख टाका.

Submit बटणावर क्लिक करा.

प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल.

प्रवेशपत्र डाउनलोड करून किमान 2–3 प्रती प्रिंट करून ठेवा.

महाराष्ट्र पोलीस प्रवेशपत्रावर नमूद असलेली माहिती

प्रवेशपत्र डाउनलोड केल्यानंतर खालील तपशील नीट तपासावेत:

उमेदवाराचे नाव

अर्ज / नोंदणी क्रमांक

छायाचित्र व स्वाक्षरी

शारीरिक चाचणीची तारीख व रिपोर्टिंग वेळ

चाचणी केंद्राचा पत्ता

शारीरिक चाचणीसंबंधी सूचना

⚠️ कोणतीही चूक आढळल्यास त्वरित भरती प्राधिकरणाशी संपर्क साधावा.

महाराष्ट्र पोलीस शारीरिक चाचणी तारीख 2026

प्रत्येक उमेदवाराची शारीरिक चाचणीची तारीख प्रवेशपत्रावर स्वतंत्रपणे नमूद करण्यात आलेली आहे. उमेदवारांनी फक्त प्रवेशपत्रावर दिलेल्या तारखेलाच व वेळेलाच चाचणीस हजर राहणे बंधनकारक आहे.

कार्यक्रमतारीख
प्रवेशपत्र जाहीर7 फेब्रुवारी 2026
शारीरिक चाचणीप्रवेशपत्रानुसार

महाराष्ट्र पोलीस शारीरिक चाचणी 2026 – पात्रता निकष

महाराष्ट्र पोलीस शिपाई शारीरिक चाचणी ही कार्यक्षमता चाचणी स्वरूपात घेतली जाते. पुरुष व महिला उमेदवारांसाठी शारीरिक निकष वेगवेगळे आहेत.

प्रकारशारीरिक पात्रता
उंची (पुरुष)165 सेमी
उंची (महिला)155 सेमी
छाती (पुरुष)79–84 सेमी

शारीरिक चाचणीसाठी आवश्यक कागदपत्रे

शारीरिक चाचणीच्या दिवशी खालील कागदपत्रे व साहित्य सोबत असणे आवश्यक आहे:
महाराष्ट्र पोलीस शारीरिक चाचणी प्रवेशपत्र 2026 (प्रिंटेड कॉपी)
वैध फोटो ओळखपत्र (आधार कार्ड / मतदान ओळखपत्र / ड्रायव्हिंग लायसन्स / पासपोर्ट)
Recent पासपोर्ट साइज फोटो
ग्राउंड साठी योग्य कपडे व बूट
पाण्याची बाटली
Previous Post Next Post